Surprise Me!

नीरेत माऊलींच्या पादुकांना स्नान; संत सोपान काका पालखीचं पहिलं अश्व रिंगण संपन्न, पाहा भक्तीसोहळ्याची ड्रोन दृश्य

2025-06-27 6 Dailymotion

<p>पुणे : 'माऊली माऊली' नामाचा जयघोष करत, टाळ-मुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आलं. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला.  माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. गुरुवारी सकाळी नीरा नदीच्या दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पादुकांना नीरा नदीच्या पाण्यानं स्थान घातलं. तर, संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचं सोमेश्वरनगरमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. गुरुवारी सकाळी 10 वाजता निंबुत इथून मार्गस्थ झालेली संत सोपानकाकांची पालखी न्याहरीसाठी निंबुत छपरी इथं थांबली. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत केलं. यानंतर वाघळवाडी अंबामाता मंदिरात पालखीला विसावा देण्यात आला. यावेळी नीरा-बारामती रस्त्यावर गावकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी रांगोळीने मार्ग सजवला होता.</p>

Buy Now on CodeCanyon